दुबई – महेंद्रसिंह धोनीला पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये खेळायचे असेल तर त्याला आधी बीसीसीआयच्या नियमांचा अडथळा पार करावा लागणार आहे. परस्पर हितसंबंधांच्या नियमाची रचना पाहिल्यावर धोनीला भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून कार्यरत राहताना किंवा राहिल्यानंतरही या नियमाचा फटका बसू शकतो, असे सांगितले जात आहे.
आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने चौथे विजेतेपद साकार केले. मात्र, त्यानंतर या स्पर्धेतून धोनीने निवृत्तीबाबतच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. आयपीएलच्या पुढील मोसमासाठी खेळाडूंच्या लिलावासाठीच्या बीसीसीआयच्या नियमांवर सर्व गोष्टी अवलंबून असल्याचे धोनीने सांगितले.
पुढील मोसमात दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार असून, खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेते, यावर बऱ्याच गोष्टी ठरतील. आम्हाला चेन्नई संघाच्या हिताचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. चे
न्नईने पुढील दशकभराचा विचार करणे गरजेचे असल्याचे धोनीला वाटते. त्याने यापूर्वीही चेन्नईमध्ये अखेरचा सामना खेळून निवृत्त व्हायला आवडेल, असे सांगितले होते.