मुंबई – दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार व मुंबईचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याला आपल्याकडे घेण्यासाठी आयपीएल स्पर्धेतील विविध संघांनी फिल्डिंग लावली आहे. दुखापतीमुळे गेल्या वर्षीच्या स्पर्धेतून अय्यरने मधूनच माघार गेतली होती. तेव्हा त्याच्या जागी दिल्लीने ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवले होते.
पंतच्या नेतृत्वात संघाने चमकदार कामगिरी केली होती. असे असले तरी आता पुन्हा एकदा दिल्लीसह रॉय चॅलेंजर बेंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स संघांनी अय्यरला आगामी लिलावात आपल्या संघात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.