जयपूर – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेत पराभूत झालेल्या इंग्लंड संघामुळे आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेला फटका बसण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या अत्यंत निराशाजनक पराभवामुळे आपल्या खेळाडूंच्या आयपीएल स्पर्धेतील सहभागावर इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने बंदी लावण्याचे संकेत दिले आहेत.
राजस्थान रॉयल संघाकडून इंग्लंडचा जोस बटलर याच्यासह आणखी काही खेळाडू खेळतात. बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो तसेच मोईन अली देखील आयपीएल स्पर्धेत विविध संघाकडून खेळतात.
जर मंडळाने त्यांच्यावर आयपीएल खेळण्यास बंदी लावली तर राजस्थानसह अन्य काही संघांना व पर्यायाने आयपीएल स्पर्धेलाही फटका बसणार आहे.