मुंबई – आयपीएल 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा संघ दोन बदलांसह तर कोलकाता तीन बदलांसह मैदानात उतरला आहे.
#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #KKR.
Live – https://t.co/jZMJFLuj4h #DCvKKR #TATAIPL pic.twitter.com/P13XwhLny7
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
दिल्लीत खलील अहम आणि सर्फराज खानच्या जागी चेतन साकारिया आणि मिचेल मार्शला संधी देण्यात आली आहे. खलीलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
कोलकाताच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. अॅरोन फिंच, हर्षित राणा आणि बाबा इंद्रजीत यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी वरुण चक्रवर्ती कोलकाता संघातून बाहेर पडला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आज 150 वा टी-20 सामना खेळत आहे.
दिल्ली संघांचे प्लेइंग-11 : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (w/c), मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रोवमन पॉवेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया.
कोलकाता संघांचे प्लेइंग-11 : अॅरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (c), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, बाबा इंद्रजीत (wc), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा.