मुंबई – चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसला आहे. त्यांच्या सराव सत्रात गोलंदाजी केलेल्या गोलंदाजाला करोनाची बाधा झाल्याने स्पर्धेत पुन्हा एकदा करोनाची एन्ट्री झाली आहे.
इतकेच नव्हे तर दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याला ताप आल्यामुळे उपचारांसाठी गुर्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला करोनाची बाधा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या सामन्याला काही तास बाकी होते त्यापुर्वीच शॉ याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे कर्णधार ऋषभ पंतसह सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
सराव सत्रात गोलंदाजी केलेल्या व करोनाची बाधा झालेल्या गोलंदाजंच्या संपर्कात आलेल्या खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना विलगीकरणात पाठवले गेले असून सर्व खेळाडूंची सपोर्ट स्टाफसह करोना चाचणी केली जाणार आहे.