#IPL2021 : आगामी सामन्यात विराटसेना दिसणार निळ्या जर्सीत; ‘हे’ आहे खास कारण…

नवी दिल्ली – देशासह राज्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही तेवढ्याच वेगाने मोठी वाढ होत आहे. दरम्यान, हीच परिस्थिती पाहता राज्य सरकारने लॉकडाउनचा कालावधी १५ मे पर्यंत वाढवला आहे. शिवाय, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास १ तारखेपासून सुरूवात झाली आहे. मात्र एवढे नियोजन करूनही राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ आणि मृत्यू काही कमी होताना दिसत नाही.

काही ठिकाणी तर ऑक्सिजन, औषधं आणि रुग्णालयात बेडसाठी नागरिकांना रांगा लागल्या आहेत. त्यात लसीकरण मोहीम सुद्धा मंदावली आहे. सध्या देश सर्वच बाजुंनी संकटात सापडला असता, भारताला इतर देशांकडून मदतीचा हात मिळत आहे. सर्वच क्षेत्रातील दिग्ज मंडळी पुढे सरसावले असून कोरोनाच्या कठीण काळात मदत करत आहे.

दरम्यान, आता आयपीएल स्पर्धेत खेळणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुही या मोहीमेत सहभागी झाली आहे. येणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लाल नाही तर निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. सामन्यानंतर या जर्सीचा लिलाव करण्यात येणार असून जमा होणार सर्व पैसा ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरण्यात येणार आहे.

कोरोना संकटात मोलाची जबाबदारी बजावण्याऱ्या फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांचं या माध्यमातून समर्थन केलं जाणार आहे. संकट काळात करत असलेल्या कामाची जाणीव करून दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या सामन्यात लाल जर्सी ऐवजी विराटसेना निळ्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. या जर्सीवर सर्व खेळाडूंची सही देखील असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.