#IPL2021 : आर. अश्‍विनची टी-20 क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी

दुबई – रविचंद्रन अश्‍विनने टी-20 क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी केली आहे. त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थानच्या डेविड मिलरला बाद केल्यानंतर टी-20 स्पर्धेत 250 बळी पूर्ण केले.

टी-20 मध्ये अशी कामगिरी करणारा अश्‍विन भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी पीयूष चावला आणि अमित मिश्रा यांनी केला आहे.

या दोघांच्या नावावर प्रत्येकी 262 बळी आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ड्‌वेन ब्रावोच्या नावावर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.