#IPL2021 : मुंबईला सर्व सामने जिंकण्याची गरज

शारजा – रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून पराभूत झालेल्या मुंबईसमोर आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील उर्वरित चारही लढतींत विजय मिळवणे आवश्‍यक बनले आहे.

पुढील सर्व सामने जिंकले तरच यंदाच्या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळण्याची त्यांना संधी आहे. मात्र, केवळ हे सामने जिंकून चालणार नसून त्यांना नेट रनरेटही वाढवणे गरजेचे आहे.

मुंबईवर सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. मात्र, त्यातही बेंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानापर्यंत घसरला आहे. मुंबई इंडियन्सचे 10 सामने झाले असून, त्यात सहा पराभव झाले आहेत.

त्यांनी चार सामन्यांत विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली आहे. दुसरीकडे बेंगळुरू संघाने मुंबईचा पराभव केल्यावर त्यांचे आता 12 गुण झाले असून, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी किमान दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.