IPL2021 : करोनाला रोखण्यात बायो-बबलही अपुरे; चेन्नई, कोलकाता संघातील खेळाडू पॉझिटीव्ह

नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेलिब्रेटी सापडेल असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला असताना देशातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा मात्र सुरू आहे. आयपीएलमध्ये असलेल्या बायो-बबल व्यवस्थेमुळे स्पर्धा सुरू होती. मात्र ही व्यवस्था अपुरी पडल्याचं स्पष्ट झालं असून चेन्नई आणि कोलकाता संघात रुग्ण सापडले आहेत.

कोलकाता संघात रुग्ण सापडल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघादरम्यान आज होणार लढत रद्द करण्यात आली आहे. या हंगामातील हा ३० वा सामना होता. ही लढत कधी होणार हे निश्चित सांगणार नाही.


कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा समावेश आहे. तर संघातील इतर खेळाडू निगेटीव्ह आहेत. चक्रवर्ती आणि वॉरियर यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.

दरम्यान चेन्नई संघातील तिघांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, बालाजी आणि मेंटनन्स स्टाफ यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.