चेन्नई – चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या उर्वरीत सामन्यांसाठी अमिरातीला रवाना होण्यापूर्वी सराव सत्रात सहभागी होण्यासाठी येथे दाखल झाला.
चेन्नई विमानतळावर त्याचे आगमन झाले तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. अनेक चाहत्यांनी धोनीच्या भोवताली असलेले सुरक्षाकडे देखील भंग करत धोनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला.
धोनीनेही चाहत्यांना निराश न करता फोटो काढून दिले तसेच काही चाहत्यांसह सेल्फीही काढले तसेच चाहत्यांना स्वाक्षरीही दिली.