#IPL2020 : खेळाडूंच्या सुटलेल्या पोटामुळे निर्माण झाले प्रश्‍न

दुबई – करोनाच्या धोक्‍यामुळे स्पर्धा ठप्प झाल्याने खेळाडूंना घरातच अडकून पडावे लागले. याकाळात काही खेळाडूंनी स्वतःच्या फिटनेसकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अगदी ठळकपणे दिसून येत आहे. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह अनेक खेळाडूंचे पोट सुटले असून या ढेरपोट्या खेळाडूंवर सध्या सोशल मीडियावर प्रचंड ताशेरे ओढले जात आहेत. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रोहित जेव्हा नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हापासूनच त्याला ट्रोल केले जात आहे.

रोहितसह सौरभ तिवारी, पियुष चावला, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रवीचंद्रन अश्‍विन, पार्थिव पटेल, मुरली विजय या खेळाडूंची तंदुरुस्ती संपूर्ण स्पर्धेत टिकेल का, असाही प्रश्‍न सध्या विचारला जात आहे. मार्च महिन्यापासून खेळाडूंना स्पर्धा ठप्प झाल्याने प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव मिळाला नाही. तसेच सरावही बंद झाल्याने तंदुरुस्तीचाही प्रश्‍न निर्माण झाला. हेच या स्पर्धेतून सिद्ध होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.