#IPL2020 : हैदराबादचे दिल्लीसमोर 163 धावांचे आव्हान

आबूधाबी – जाॅनी बेयर्सटो यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टाॅस जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. त्यानंतर हैदराबादने 20 षटकांत 4 गडी गमावून 162 धावा केल्या.

हैदराबादकडून जाॅनी बेयर्सटोने 48 चेंडूत (2 चौकार व 1 षटकार) सर्वाधिक 53 धावा केल्या. तर डेविड वाॅर्नरने 33 चेंडूत (3 चौकार व 2 षटकार) 45, केन विलियमसनने 26 चेंडूत (5 चौकार) 41 धावांची खेळी केली. मनीष पांडे स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 3 धावा केल्या. अब्दुल समदने 6 चेंडूत (1 चौकार व 1 षटकार) नाबाद  12 धावा केल्या.  

दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाजीत कगिसो रबाडा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. रबाडाने 4 षटकात 21 तर मिश्राने 4 षटकात 35 धावा दिल्या. इशांत शर्माने 3 षटकांत 26 तर मार्कस स्टोईनिसने 3 षटकात 22 धावा दिल्या. ऐनरिक नाॅर्टजेची गोलंदाजी सर्वात महागडी ठरली. त्याने 4 षटकांत 40 धावा दिल्या. अक्षर पटेलने 2 षटकांत 14 धावा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.