शारजा – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ विजयाच्या मार्गावर आला असून कर्णधार विराट कोहली आणि कंपनीला रोखण्याचे आव्हान आजच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर राहणार आहे. पंजाबला विजय मिळवायचा असेल तर त्यांना कोहली, एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल व ऍरन फिंच यांना रोखावे लागेल. केवळ त्यांच्या फलंदाजांवरच नव्हे तर त्यांच्या गोलंदाजांवरही दडपण राखावे लागणार आहे.
बेंगळुरू विरूध्द पंजाब या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Virat Kohli wins the toss and #RCB will bat first against #KXIP at Sharjah.#Dream11IPL pic.twitter.com/akYXohimjf
— IndianPremierLeague (@IPL) October 15, 2020
दरम्यान,विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला विजय मिळवणे आवश्यक बनले आहे. या स्पर्धेत पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाशी असून त्यांनी पुढील सर्व सामने जिंकले तरच त्यांना स्पर्धेतील आव्हान कायम राखणे शक्य होणार आहे.