आबूधाबी – रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्स समोर विजयासाठी 196 धावांचे आव्हान ठेवले आहे. कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक (टाॅस) जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 195 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
Innings Break!
A well made 80 by @ImRo45 , 47 by Surya and a quickfire 21 by Tiwary helps @mipaltan post a total of 195/5 on the board.
Will #KKR chase this down?#Dream11IPL #KKRvMI pic.twitter.com/GXxtH7FRsH
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2020
मुंबईचा सलामीवीर क्विटंन डी काॅक अवघ्या 1 धावेवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने 28 चेडूंत (6 चौकार व 1 षटकार) 47 धावा केल्या. रोहितने 54 चेंडूत (3 चौकार व 6 षटकार) सर्वाधिक 80 धावा करत संघाची धावसंख्या 177 पर्यंत पोहचवली. याव्यतिरिक्त सौरभ तिवारीने 21(13 चेंडू), हार्दिक पांड्याने 18(13 चेंडू) आणि कायरन पोलार्डने 7 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या.
कोलकाताकडून गोलंदाजीत शिवम मावीने 4 षटकांत 32 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर सुनील नरेनने 4 षटकांत 22 धावा देताना एक विकेट घेतली. आंद्रे रसेलने 2 षटक टाकले. त्याने 17 धावा देताना 1 विकेट घेतली. कुलदीप यादव, संदीप वारीयर आणि पॅट कमिन्स हे गोलंदाजीत महागडे ठरले आणि त्यांना एकही विकेट मिळवता आली नाही. कुलदीपने 4 षटकांत 39 तर कमिन्सने 3 षटकांत सर्वाधिक 49 धावा दिल्या. संदीप वारियरने 3 षटकांत 34 धावा दिल्या.