#IPL2020 : तेवतियाने मैदान जिंकले

एकाच खेळीत जागतिक लोकप्रियता

शारजा – कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन यांच्या आक्रमक खेळीनंतरही राजस्थानचा पराभव स्पष्ट दिसत असताना राहुल तेवतियाने चमत्कार केला. पंजाबच्या शेल्डन कोट्रेलच्या एकाच षटकात 5 षटकारांची आतषबाजी करत त्याने अशक्‍य वाटत असलेला विजय संघाला मिळवून दिला. 

पंजाबने 223 धावांचा डोंगर उभा केला होता. डावाच्या 17 व्या षटकापर्यंत तरी पंजाबलाच विजेता मानले जात होते. मात्र, 18 व्या षटकात संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो नवोदित क्रिकेटपटू तेवतिया.

त्याने या एकाच षटकात 30 धावा काढल्या व सामन्यातील हवाच काढून टाकली. खरेतर तो खेळपट्टीवर आला तेव्हा त्याने खेळलेल्या पहिल्या 19 चेंडूत केवळ 8 धावाच केल्या होत्या. त्यावेळी समालोचकांनीही त्याला या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवले गेले यावर टीका सुरू केली होती. मात्र, तेवतियाने त्यांचीही तोंडे बंद केली.

एकाच खेळीने त्याच्या कारकिर्दीलाही नवे वळण लागले आहे. तेवतियाने नंतर मात्र खेळलेल्या 12 चेंडूत 6, 0, 2, 1, 6, 6, 6, 6, 0, 6, 6 अशी फटकेबाजी करत 45 धावा चोपल्या व राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला.

ठळक घडामोडी :-

  • राहुल तेवतियाचीच चर्चा
  • हरियाणाच्या क्रिकेटपटूकडून अफलातून फलंदाजी
  • पंजाबविरुद्धच्या सामन्यात षटकारांची आतषबाजी
  • शेल्डन कोट्रेलच्या एकाच षटकात 5 षटकार
  • पंजाबच्या तोंडातून विजय खेचला
  • संघातील समावेशाबाबत झाली होती टीका
  • एकाच खेळीत जागतिक लोकप्रियता

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.