दुबई – किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची ताकद आता पुढील सामन्यांमध्ये वाढणार आहे. अन्नातून विषबाधा झालेला ख्रिस गेल पूर्ण तंदुरुस्त ठरला असल्याने पंजाबला दिलासा मिळाला आहे.
या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर आजवर एकाही सामन्यात त्याला खेळता आले नव्हते. त्याचवेळी त्याला अन्नातून विषबाधा झाल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तो बरा झाला असून येत्या गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्धच्या लढतीसाठी तो उपलब्ध असेल, असे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले आहे.