#IPL2020 : राजस्थानचा पंजाबवर ‘राॅयल’ विजय

शारजा : संजू सॅमसन आणि राहुल तेवातिया यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर राजस्थान राॅयल्सने किग्सं इलेव्हन पंजाबचा 4 गडी राखून पराभव केला. विजयासाठीचं 224 धावांच आव्हान राजस्थानने 19.3 षटकांत 6 विकेटच्या मोबदल्यात 226 धावा करत पूर्ण केलं. संजू सॅमसन सामन्याचा मानकरी ठरला.

राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर 4(7) लवकर बाद झाला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसनने डाव सावरला. स्टीव्ह स्मिथ 27 चेंडूत (7 चौकार व 2 षटकार) 50 धावा काढून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनने 42 चेंडूत (7 षटकार व 4 चौकार) 85 धावांची आणि राहुल तेवतियाने 31 चेंडूत (7 षटकार) 53 धावांची खेळी करत विजयी लक्ष्य सोप्पे केले. राहुल तेवतियानं 18 व्या षटकांत शेल्डन काॅटरेलला 5 षटकार ठोकत विजय जवळपास निश्चित केला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने 3 चेंडूत (2 षटकार) 13 आणि टाॅम करनने 1 चेंडूत नाबाद 4 धावा करत विजय साकारला.

पंजाबकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने 4 षटकांत 53 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर, शेल्डन काॅटरेल(3 षटकांत 52धावा), जेम्स नीशम (4 षटकांत 40धावा)आणि मुरूगन अश्विन (1.3 षटकांत 16धावा )यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. रवी बिश्नोईने 4 षटकांत 40 धावा तर ग्लेन मॅक्सवेलने 3 षटकांत 29 धावा दिल्या.

तत्पूर्वी, कर्णधार स्टिव्ह स्मिथने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारताना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर मयंक अग्रवालच्या शतकी आणि के एल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान समोर 20 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात 223 धावा करत राजस्थानसमोर 224 धावांच आव्हान ठेवलं होत.

राहुल आणि मयंकने तूफान फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागिदारी केली. मयंक अग्रवालने 50 चेंडूत (7 षटकार आणि 10 चौकार) 106 धावा केल्या. संघाची धावसंख्या 18 षटकांत 194 असताना के एल राहुल बाद झाला. त्याने 54 चेंडूत (1 षटकार व 7 चौकार) 69 धावा केल्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 9 चेडूंत 13 आणि निकोलस पूरनने 8 चेंडूत (3 षटकार व 1 चौकार) नाबाद 25 धावा करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 223 पर्यंत नेली.

राजस्थान राॅयल्सकडून गोलंदाजीत अंकित राजपूत (4 षटकांत 39 धावा) आणि टाॅम करन (4 षटकांत 44 धावा) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. जोफ्रा आर्चर (4 षटकांत 46 धावा) आणि श्रेयस गोपाल (4 षटकांत 44 धावा) यांची गोलंदाजी महागडी ठरली. अंकित राजपूतने 4 षटकांत 39 तर जयदेव उनादकटने 3 षटकांत 30 धावा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.