#IPL2020 : दिल्लीचे चेन्नईसमोर 176 धावांचे आव्हान

दुबई – सलामीवीर पृथ्वी शाॅच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले आहे. चेन्नईचा कर्णधार एम.एस.धोनी याने क्षेत्ररक्षण स्विकारताना दिल्ली संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर दिल्लीने 20 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात 175 धावा केल्या.

दिल्लीकडून पृथ्वी शाॅने 43 चेंडूत (9 चौकार व 1 षटकार) सर्वाधिक  64 धावांची खेळी केली.  शिखर धवनने 35(27) तर श्रेयस अय्यरने 26(22) धावा केल्या. रिषभ पंतने 25 चेंडूत (6 चौकार) नाबाद 37 आणि मार्कस स्टोइनिसने नाबाद 5(3) धावा केल्या.

चेन्नईकडून गोलंदाजीत पियुष चावलाने 4 षटकात 33 धावा देत सर्वाधिक 2 तर सॅम करनने 4 षटकात 27 धावा देत 1 विकेट घेतली. फिरकीपटू रविंद्र जडेजाची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने 4 षटकात 44 धावा दिल्या. याव्यतिरिक्त दीपक चहरने 4 षटकात 38 तर जोश हेझलवूड 4 षटकात 28 धावा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.