#IPL2020 : दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला

आबुधाबी – आयपीएल स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होत आहे. या स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद करण्याची दिल्लीला संधी आहे. तर, दोन पराभव मागे टाकून सरस खेळ करण्याचे हैदराबादसमोर आव्हान आहे. 

दिल्ली विरूध्द हैदराबाद यांच्यातील महत्वपूर्ण लढतीस थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने क्षेत्ररक्षणाचा (गोलंदाजी) निर्णय घेत सनरायझर्स हैदाराबादला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

दरम्यान,या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दिल्लीने किंग्ज इलेव्हन पंजाबचा तर, दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले असून हैदराबादवर विजय मिळवत सलग तिसरा विजय मिळविण्यासाठी त्यांचा संघ सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे हैदराबादला पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकण्याचं त्याचं लक्ष्य असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.