दुबई – मार्कस स्टोइनिसच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राॅयल चॅलेंजर बेंगळुरूसमोर विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने टाॅस जिंकून दिल्ली संघास फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. त्यानंतर दिल्लीने 20 षटकांत 4 गड्याच्या मोबदल्यात 196 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
#IPL2020 Delhi Capitals set a target of 197 runs for Royal Challengers Bangalore, at Dubai International Cricket Stadium https://t.co/BdNyN69RfV
— ANI (@ANI) October 5, 2020
दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शाॅ ने 23 चेंडूत ( 5 चौकार व 2 षटकार) 42 तर शिखर धवनने 28 चेंडूत (3 चौकार) 32 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला. त्याने 13 चेंडूत 11 धावा केल्या.रिषभ पंतने चांगली खेळी केली. पंतने 25 चेंडूत (3 चौकार व 2 षटकार) 37 धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने 26 चेंडूत (6 चौकार व 2 षटकार) नाबाद 53 धावांची तर शिमरन हेटमायरने 7 चेंडूत नाबाद 11 धावा केल्या.
बेंगळुरूकडून मोहम्मद सिराजने 4 षटकांत 34 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. इसुरू उदाना आणि मोईन अलीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. उदानाने 4 षटकांत 40 तर अलीने 2 षटकांत 21 धावा दिल्या. नवदीप सैनी महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3 षटकांत 48 धावा दिल्या. याव्यतिरिक्त युजवेंद्र चहलने 3 षटकांत 29 तर वाॅशिगंटन सुंदरने 4 षटकांत 20 धावा दिल्या.