दुबई – कागीसो रबाडा, अक्सर पटेल व अनरिच नोर्जे यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 59 धावांनी पराभव केला. विजयासाठी 197 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूचा डाव 20 षटकांत 9 बाद 137 धावांवर रोखत दिल्लीने बाजी मारली.
तत्पूर्वी, सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्या उपयुक्त खेळीनंतरही घसरगुंडी उडालेल्या दिल्ली कॅपिटल्सचा डाव मार्क स्टोनिसनीे केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे सावरला. स्टोनिससह तळातील फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे दिल्लीने रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघासमोर विजयासाठी 197 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
शॉ व धवन या दिल्लीच्या सलामीवीरांनी संघाला 68 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर धोकादायक ठरू पाहणाऱ्या या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात दिल्लीला यश आले. महंमद सिराजने शॉ याला बाद केले. त्याने 23 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार फटकावताना 42 धावांची खेळी केली.
मोठी धावसंख्या उभारण्यात धवन पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 28 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा केल्या. त्याला इसुरू उदानाने बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरनेही निराशा केली. त्याला फिरकी गोलंदाज मोइन अलीने बाद केले. अर्थात त्याला बाद करण्यात अलीपेक्षा देवदत्त पडीक्कलचे क्षेत्ररक्षण अफलातून ठरले. श्रेयसने टोलावलेला हा फटका षटकारच ठरणार होता. मात्र, पडीक्कलने त्याचे झेलात रुपांतर केले.
त्यानंतर स्टोनिसने डाव सावरला. त्याने ऋषभ पंतसह संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्याने स्टोनिससह चौथ्या गड्यासाठी 89 धावांची भागीदारी केली. स्टोनिसने अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याने शेमरन हेटमायरसह संघाला 4 बाद 196 अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक –
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 4 बाद 196 धावा. (पृथ्वी शॉ 42, शिखर धवन 32, मार्कस स्टोनिस नाबाद 53, ऋषभ पंत 37, शेमरन हेटमायर नाबाद 11, महंमद सिराज 2-45, मोइन अली 1-21, इसुरू उदाना 1-40). रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 9 बाद 137 धावा. (विराट कोहली 43, कागीसो रबाडा 4-24, अनरिच नोर्जे 2-22, अक्सर पटेल – 2-18).
स्पर्धेतील ठळक घडामोडी
- अमित मिश्राला दुखापत
- दिल्ली संघाला धक्का
- एरियल कॅमेरा ठरतोय डोकेदुखी
- फलंदाजांनी फटकावलेले चेंडू लागल्याने पंचही संभ्रमात
- डेड बॉल की बाद निर्णयही ठरले वादग्रस्त
- शेन वॉटसन व फाफ डुप्लेसी यांची विक्रमी सलामी
- हसी व विजय यांनी दिली होती 159 धावांची सलामी
- वॉटसन व डुप्लेसी यांची 181 धावांची नाबाद भागीदारी