#IPL2019 : सनरायजर्स हैदराबादचा कोलकातावर दणदणीत विजय

हैदराबाद – जॉनी बेयर्सटोच्या तडाकेबाज नाबाद 80 आणि डेविड वार्नरच्या 67 धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 9 गडी आणि 30 चेंडू राखून पराभव केला आहे. हैदराबाद संघाचा हा पाचवा विजय असून त्यांचे 10 गुण झाले आहेत. तर कोलकाता संघाचा आजच्या सामन्यातील पराभवसह हा सहावा पराभव ठरला.

विजयासाठीचे 160 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने केवळ 15 षटकांत पूर्ण केले. हैदराबादकडून सलामीवीर जॉनी बेयर्सटोने 43 चेंडूत ( 7 चौकार आणि 4 षटकार) नाबाद 80 आणि डेविड वार्नरने 38 चेंडूत (3 चौकार आणि 5 षटकार) 67 धावा केल्या.

तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 159 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रिस लिनने 51(47), सुनील नारेन 25(8), शुबमन गिल 3(4), नितीश राणा 11(11), रिंकु सिंह 30(25) आणि आंद्रे रसेल 15(9) धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादकडून खलील अहमद 4 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारने 2 तर संदीप शर्मा आणि रशिद खान यांने 1 विकेट घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.