#IPL2019 : आंद्रे रसेलची तुफान खेळी; कोलकत्ताचा हैदराबादवर विजय

कोलकत्ता – कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकताने हैदराबादवर सहा गडी राखून विजय मिळविला आहे. आंद्रे रसेलने आपल्या तुफान खेळीत 19 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारासह नाबाद 49 धावा केल्या.

कोलकता संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादनं 20 षटकांत 3 बाद 181 धावां करत कोलकताला 182 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादकडून डेविड वार्नरने 53 चेंडूत 85 धावा केल्या. तर जाॅनी बेयर्सटोने 39 आणि विजय शंकरने नाबाद 40 धावा केल्या.

प्रत्युत्तरात कोलकत्ताने 182 धावांचे आव्हान 19.4 षटकांत 4 बाद 183 धावा करत पूर्ण केले. कोलकत्ताकडून नितीश राणाने 47 चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांसह 68 तर राॅबिन उथप्पाने 27 चेंडूत 35 धावा (3 चौकार, 1 षटकार) केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.