#IPL2019 : दिल्लीसमोर हैदराबादचे कडवे आव्हान

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती दोन्ही संघांना जाणवणार

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
वेळ – रा. 7.30 वा
स्थळ – विशाखापट्टणम

विशाखापट्टनम  – सात वर्षांमध्ये प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर एलिमेनेटरच्या पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यातील पराभूत संघाने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येनार असून विजेत्या संघाला मुंबई आणि चेन्नई दरम्यान झालेल्या सामन्यातील पराभूत झालेल्या संघासोबत झुंज द्यावी लागणार आहे.

यंदाच्या मोसमात दिल्लीच्या संघाने नाव बदलण्यासोबतच आपल्या संघात अनेक बदल केल्याने संघाचे नशीब पालटले. यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासून त्यांनी प्रतिस्पर्धीसंघांवर वर्चस्व गाजवत आपले वर्चस्व निर्माण केले. त्या विरुद्ध यंदाच्या मोसमात सनरायजर्स हैदराबादच्या संघाने कामगिरी केली असून त्यांनी यंदा तब्बल आठ सामन्यांमध्ये पराभव पत्करला असून केवल धावांच्या सरासरीच्या बळावर त्यांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

दिल्लीच्या संघाने यंदाच्या मोसमात तब्बल सात वर्षांनंतर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. त्यातच त्यांना सतत डोके दुखी ठरणारा सलामी जोडीचा पेच त्यांनी यंदाच्या मोसमात सोदवला असून सध्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी संघाला आश्‍वासक सुरूवात करुन दिली आहे. ज्यात शिखर धवनने यंदाच्या मोसमात 486 धावा केल्या आहेत. तर, पृथ्वी शॉने 292 धावा केल्या आहेत. तर, त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतयांनी मधल्या फळीत उत्तम कामगिरी करत दिल्लीच्या संघाला अनेक सामन्यांमध्ये पराभवाच्या छायेतून बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे.

तर, दुसरीकडे हैदराबादच्या संघाचे स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो माघारी परतले असून सध्या सलामीचा भार कर्णधार केन विल्यम्सन आणि वृद्धीमान सहा यांच्याकडे आली आहे. ज्यात केन विल्यम्सनने अखेरच्या साखळी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. तर, साहाला अद्याप चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ संकटात सापदलेला आहे. त्यातच मधल्या फळीतील मनिष पांडे वगळता इतर एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नसल्याने त्यांना आपल्या कामगिरीत सुधारना करने गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.