#IPL2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हवा पहिला विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Vs दिल्ली कॅपिटल्स

वेळ – दु. 4.00 वा.
स्थळ -एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

बंगळुरु  – यंदाच्या सत्रात सलग पाच पराभव स्वीकारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला विजय मिळविण्याची गरज आहे. या स्पर्धेत पाच सामन्यात पराभव झाल्याने गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेला आरसीबीचा कर्णधार विराट कोहली दमदार प्रदर्शन करत विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवावे लागणार आहे. तर दिल्ली संघ दुसरा विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल.

कोलकाता नाइट रायडर विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली (84 धावा) आणि डि व्हिलियर्सने (63 धावा) करत 108 धावांची निर्णायक भागिदारी केली होती. पण, आंद्रे रसेलच्या तुफान फटकेबाजीमुळे 205 धावा करुनही विराटच्या संघाला विजय मिळविता आला नाही. या सामन्यात युजवेंद्र चहल आणि पवन नेगी यांच्याशिवाय अन्य गोलंदाज अयशस्वी ठरले. केकेआरविरुद्ध शेवटच्या चार षटकांत 66 धावा दिल्याने कोहलीनेही गोलंदाजीवर नाराजी व्यक्‍त केली होती.

बंगळुरूच्या फलंदाजाचेही प्रदर्शन निराशाजनकच राहिले आहे. चेन्नई सुपर किंग्स विरोधात फक्‍त 70 धावा, तर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 113 धावांवर डाव संपुष्टात आला होता. तसेच राजस्थानबरोबरही संघातील फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही. आता दिल्लीविरुद्ध संघातील प्रमुख फलंदाजांनी मोठी खेळी केल्यास संघाला पहिला विजय मिळविता येईल.

दुसरीकडे दिल्ली समोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. पहिल्या सामन्यात मुंबईवर विजय मिळविल्यानंतर संघाला तीन पराभवाचा सामना करावा लागला. षभ पंतने मुंबईविरुद्ध 78 धावा केल्या होत्या. तर शिखर धवन, पृथ्वी सॉ, श्रेयस अय्यर आणि कोलिन इनग्राम यांना लय सापडली आहे. तसेच संघात गोलंदाज कासिगो रबाडासह ट्रेंट बोल्ट आणि इशांत शर्मा यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.