#IPL2019 : राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 4 विकेटसने विजय

मुंबई – यष्टीरक्षक जोस बटलरच्या 87 धावांच्या शानदार खेळीच्या मदतीने राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 4 विकेटस्‌नी पराभूत केले. या विजयासह राजस्थानने या सत्रातील दुसरा विजय नोंदविला.

विजयासाठीचे 188 धावांचे आव्हान राजस्थआन राॅयल्सने 19.3 षटकांत 6 गडी गमावत पूर्ण केले. राजस्थान राॅयल्सकडून जोस बटलरने सर्वाधिक 89, अंजिक्य रहाणेने 37 आणि संजू सॅमसनने 31 धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजीत क्रुणाल पांड्याने 3, जसप्रीत बुमराहने 2 आणि राहुल चहरने 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून राजस्थानने मुंबई संघास प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडले. मुबंईने 20 षटकांत 5 गडी गमावून 187 धावां केल्या. क्विंटन डी कॉकने 52 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारासह सर्वाधिक 81 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 3 तर जयदेव उनादकट आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.