#IPL2019 : राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद समोरासमोर

-इंग्लंडचे खेळाडू परतल्याने दोन्ही संघ अडचणीत
-राजस्थानचे तीन तर हैदराबादचा एक खेळाडू अनुपस्थित

जयपूर – आयपीएलचा बारावा मोसम शेवटाकडे झुकला असून आगामी विश्‍वचषक स्पर्धा लक्षात घेत अनेक परदेशी खेळाडू पुन्हा आपापल्या राष्ट्रीय संघांमध्ये दाखल झालेले असून आयपीएलच्या महत्वाच्या सामन्यांना ते खेळाडू अनुपस्थित असल्याने संघ अडचणीत आले आहेत. त्यातच बाद फेरी गाठण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या राजस्थान आणि हैदराबाद दरम्यान आज सामना होणार असून दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक असणार आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघाने क्‍घराब सुरूवातीनंतर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत स्पर्धेत यशस्वी पुनरागमन केले होते. मात्र, स्पर्धा ऐन रंगात आली असताना संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावनारे बेन स्टोक्‍स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे विश्‍वचषकासाठीच्य तयारी करिता इंग्लंडला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ चांगलाच अडचणीत आला असून आगामी आठवड्यत कर्णधार स्टिव्ह स्मिथ देखील ऑस्ट्रेलियाला परतेल त्या पुर्वी राजस्थानच्या संघाला बाद फेरी गाठणे महत्वाचे आहे.

त्यातच मागिल मोसमा प्रमाणे राजस्थानचा संघ यंदा जोस बटलरवर अधिक विसंबून राहिला होता. मात्र, बेन स्टोक्‍सयंदा अपेक्षित कामगिरी करु शकला नसल्याने त्याची जास्त उणिव भासनार नाही. मात्र, बटलरच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्‍य रहाणे यांना जबाबदारी सांभाळावी लागेल. मात्र, राजस्थानच्या संघाला जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणार आहे. कारण आर्चरची चार षटके संघासाठी फारच महत्त्वाची होती.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
वेळ – रा. 8.00 वा
स्थळ – सवाई मानसिंग मैदान, जयपूर

तर, दुसरीकडे हैदराबादच्या संघाला सातत्याने चांगली सलामी देणारा जॉनी बेयरस्टो हा इंग्लंडला परतला असून डेव्हिड वॉर्नर आगामी आठवड्यात परतण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हैदराबादला जर बाद फेरीत जागा मिळवायची असेल तर आजचा सामना जिंकणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातच हैदराबादच्या संघाने यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करुनही त्यांना अखेरच्या क्षणी सामने गमवावे लागले आहेत त्यामुळे बाद फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना सर्व सामन्यातील विजयासहित इतर संघांमधील निकालांवर आता अवलंबून रहावे लागणार आहे.

हैदराबादने आतापर्यंत दहा सामन्यांमधील पाच सामन्यांमध्ये विजय तर पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करून दहा गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते सध्या क्रमवारीत सध्या चौथ्या क्रमांकावर असले तरी अजून त्यांना बाद फेरी गाठण्यास आठ गुणांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे इथून पुढे खेळला जाणारा प्रत्येक सामना हा त्यांच्यासाठी करा वा मरा या परिस्थिती मधिल असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

राजस्थान रॉयल्स – स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एश्‍टॉन टर्नर.

सनरायजर्स हैदराबाद – भुवनेश्‍वर कुमार (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.