#IPL2019 : अशी असेल प्ले ऑफ मधिल सामन्यांची रचना

मुंबई : वानखेडे मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाताला 9 गडी राखून पराभूत केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली. पराभवामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले.

प्ले ऑफ्स मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला पात्रता सामना रंगणार आहे. तर, बाद फेरीचा पहिला सामना दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात होईल. त्यानंतर पात्रता सामन्यातील पराभुत संघ बाद फेरीतील विजेत्या संघासोबत एक सामना खेळेल आणि त्यानंतर अंतिम सामना होईल.

प्ले ऑफ्स च्या सामन्यांचे वेळा पत्रक –

7 मे (पहिला पात्रता सामना) मुंबई विरुद्ध चेन्नई,
8 मे (बाद फेरीचा सामना) दिल्ली विरुद्ध हैदराबाद,
10 मे (दुसरी पात्रता सामना) पहिल्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध बाद फेरीतील विजेता संघ,
12 मे (अंतिम सामना) पहिल्या पात्रता सामन्यातील विजेता विरुद्ध दुसऱ्या पात्रता सामन्यातील विजेता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.