#IPL2019 : हरभजन जुन्या दारु सारखा – धोनी

चेन्नई  – कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि इम्रान ताहिरचे कौतुक करताना हे दोन खेळाडू जुन्या दारुसारखे आहेत. दिवसेंदिवस ते परिपक्व होत चालले आहेत. त्यांच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केल आहे. अस धोनी म्हणाला.

गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर सुरेख खेळ करत चेन्नईने कोलकाताला पराभवाची धूळ चारली. या लढतीनंतर धोनीने हरभजन आणि ताहिरचे मनसोक्त कौतुक केले.

यावेळी बोलताना धोनी म्हणाला की, वय या दोघांच्याही बाजूने आहे. ते जुन्या दारुसारखे आहेत आणि सातत्याने परिपक्व होत आहेत. भज्जीने आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मला जेव्हा जेव्हा बळी मिळवण्याची गरज भासली त्यावेळी ताहिरकडे मी विश्‍वासाने गोलंदाजीची जबाबदारी सोपवली आणि त्याने माझा विश्‍वास सर्थकी लावला असेही धोनी यावेळी म्हणाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.