क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड यांच्या छोटेखानी खेळींनी मुंबईला तारले
हैदराबाद – मुंबईच्या संघाने केलेल्या धमाकेदार सुरूवातीनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्या पुढे मुंबई इंडियन्सच्या संघाला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 149 धावांचीच मजल मारता आली.
Final. 19.6: DJ Bravo to K Pollard, 4 runs, 149/8 https://t.co/VN7SfrAUfT #MIvCSK #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019
हैदराबादच्या पाटा खेळपट्टीवर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली. मुंबईला कायम दमदार सुरुवात करुन देणाऱ्या क्विंटन डिकॉकने आजही आक्रमक सुरुवात केली. त्याला रोहित एकेरी आणि दुहेरी धावा काढत चांगली साथ देत होता. या दोघांनी 4 षटकांत जवळपास 40 धावा केल्या होत्या त्यामुळे मुंबईचे सलामीवीर मोठी धावसंख्या उभा करणार असे वाटत असतानाच चेन्नईने सामन्यात पुनरागमन केले. शार्दुल ठाकूरने चार षटकार ठोकून 17 चेंडूत 29 धावा करणाऱ्या डिकॉकला बाद करत मुंबईला 45 धावांवर पहिला धक्का दिला. तर, पाठोपाठ दिपक चहरने कर्णधार रोहित शर्माला 15 धावांवर बाद करत 45 धावांवर असतानाच मुंबईला दुसरा धक्का दिला.
मुंबईला बसलेल्या या दोन मोठ्या धक्यांमुळे त्यांच्या धावगतीला जोरदार ब्रेक लागला. 5 षटकांमध्ये 45 धावा करणारी मुंबई 7 षटकापर्यंत फक्त 53 धावांपर्यंत पोहचली होती. यावेळी खालावलेली धावगती वाढवण्याच्या नादात सुर्यकुमार यादव हा 15 धावा करुन परतल्याने मुंबईच्या संघाचा पाय आणखीन खोलात गेला. यावेळी मुंबईची 11.3 षटकांत 3 बाद 82 अशी अवस्था झाली होती. तर यानंतर आलेला कृणाल पांड्या हादेखील लागलीच परतल्याने मुंबईची 4 बाद 89 अशी अवस्था झाली. यावेळी धदाकेबाज सुरूवात करणारी मुंबईची अवस्था इतकी बिकट होईल याची जानीव कोणालाच नसताना यानंतर दुसऱ्या बाजुने फटकेबाजीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या इशान किशनने मुंबईला शंभर धावांची मजल ओलांडून दिली.
मात्र, तो देखील लागलीच 26 चेंडूत 23 धावाच करु शकल्याने मुंबईचा संघ मोठ्या अडचणीत सापडला. यावेळी किशन बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला साथीत घेत पोलार्डने संघाचा डाव सावरायला सुरूवात केली. त्यामुळे अडचनीत आलेला मुंबईचा संघाने आश्वासक वाटचाल सुरू केली असतानाच हार्दिक पांड्या 10 चेंडूत 16 धावांची आक्रमक खेळी करुन परतला. तर लागलीच राहुल चहार देखील परतल्याने मुंबईच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेर पोलार्डने फटकेबाजी करत मुंबईला 149 धावांची मजल मारुन दिली. यावेळी चेन्नईकडून दिपक चहारने तीन तर शार्दुल ठाकुर आणि इम्रान ताहिरयांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, मुंबईच्या संघाने मागील सामन्यातील संघात एक बदल केला असून जयंत यादवच्या जागी मिचेल मॅकलघनला संघात दाखल केले आहे. तर, चेन्नईच्या संघात कोणताही बदल केला नाही.