#IPL2019 : चेन्नईला हवा सुपर विजय

कोलकाता नाइट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज

वेळ  : 4.00 वा.
स्थळ  : इडन गार्डन, कोलकाता.

कोलकाता – आयपीएलच्या बाराव्या सत्रात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्सवर सलग दुसरा विजय हवा आहे. हा सामना रविवारी ईडन गार्डनवर रंगणार आहे. घरच्या मैदानावर सलग दोन पराभव झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघावर दबाव राहणार आहे.

या सत्रात चेन्नई सुपर किंग्जने सात सामन्यात 6 विजय मिळवून 12 गुणांसह गुणतालिकेत प्रथम स्थान मिळविले आहे. एकमेव पराभव स्वीकारलेल्या तगडया चेन्नईचे कोलकाता संघासमोर आव्हान आहे. त्यातच या सामन्यात आंद्र रसेल खेळण्याची संदिग्धता आहे. याशिवाय युवा खेळाडू शुभमान गिल चांगल्या फार्मात आहे. दिल्लीविरुद्ध त्याने 39 चेंडून 65 धावांची खेळी केली होती. परंतु केकेआरच्या सर्वच फलंदाजांना उत्कृष्ट खेळी करणे गरजेचे आहे. विशेषतः कर्णधार दिनेश कार्तिक याला पुन्हा फार्म गवसण्याची आवश्‍यकता आहे.

ईडन गार्डसवरील खेळपट्‌टी फिरकी गोलंदाजीला साथ देत नसल्याने केकेआरच्या फिरकीपटूंना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज प्रसिद कृष्ण आणि लोकी फर्ग्युसन यांनाही चांगले प्रदर्शन करता आलेले नाही.
दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीने सलग तीन विजय मिळविलेले असल्याने संघाचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. पण गतसामन्यात महेंद्रसिंह धोनी वेगळयाच कारणामुळे प्रसिद्धीत आला.

“कॅप्टन कूल’ म्हणून ओळखणारा धोनी पहिल्यांदाच पंचाच्या निर्णयाविरुद्ध मैदानात उतरताना दिसला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने पंच उल्हास गांधे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्‍त केली. यामुळे वादात सापडलेल्या धोनीवर सामन्याच्या मानधनावर 50 टक्‍के दंड आकारण्यात आला. पण माजी क्रिकेटपटूंनी धोनीची आलोचना केली. यानंतर आता पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवण्याच्या उद्‌देशाने चेन्नई मैदानात उतरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.