#IPL2019 : चुकीच्या निर्णयांचा संघाला फटका – आंद्रे रसेल

कोलकाता – आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी अतिशय खराब झाली असून सध्या कोलकाताचा संघ सातव्या स्थानी फेकला गेला आहे. यावेळी कोलकाताच्या संघाने यंदा लागोपाठ सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर संघातील वाद चव्हाट्यावर आले असून अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने चुकीच्या निर्णयांचा संघाला फटका बसल्यावे म्हणत संघ व्यवस्थापनावर टिका केली आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार दिनेश कार्तिक आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्‍न निर्माण केले गेले. संघातली ही खदखद आता अष्टपैलू आंद्रे रसेलनेही बोलून दाखवली आहे. आमचा संघ चांगला आहे, मात्र तुम्ही चुकीचे निर्णय घेत असाल तर प्रत्येक वेळी तुम्ही सामना हराल. सध्या आम्ही हेच करतोय. माझ्याकडे वेळ असता, तर काही सामन्यांमध्ये आम्ही कसे चुकलो हे मी सांगितले असते. काही सामन्यांमध्ये आम्ही योग्य गोलंदाजांना संधी दिली नाही, तसे केले असते तर आम्ही सामना जिंकलो असतो. असे म्हणत त्याने प्रत्यक्ष कर्णधार दिनेश कार्तिक आणि प्रशिक्षक जॅक कॅलिसयांच्या वर टीका केली.

दरम्यान, कोलकाताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी योग्य कामगिरी केली नसतानाही रसेलला वरच्त्या क्रमांकावर फलंदाजीला न पाठवता केवळ अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला पाठवत सामन्यात वरचढ ठरण्याची संधी कोलकाताच्या संघाने गमावली त्यामुळे कोलकाता सामने हरला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.