#IPL2019 : पहिल्या विजयासाठी बंगळुरूची धडपड तर विजयी मार्गावर परतण्यास पंजाब उत्सुक

किंग्ज इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – आय.एस. बिन्द्रा मैदान, मोहाली

मोहाली – लागोपाठ सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ धडपड करत असून मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करूनही अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागलेला किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असणार आहे.

बंगळुरूच्या संघाला यंदाच्या मोसमात एकही विजय मिळाला नसून आजच्या सामन्यात जर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असून आजच्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास त्यांचा संघ प्रयत्नशील असून यंदाच्य मोसमासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा जायबंदी नेथन कुल्टर-नाईलच्या जागी समावेश केला असून आजच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्‍यता असून त्याच्या समावेशाने कमजोर असणारी बंगळुरूच्या गोलंदाजीला धार चढणार आहे. त्यातच आता पर्यंत त्यांच्या संघातील मधल्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले असून त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास मधल्या फळीतील फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

तर, दुसरीकडे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विजयाच्या अगदी जवळ असणाऱ्या पंजाबच्या संघाला गोलंदाजांच्या खराब कामगिरीने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे असून मुजीब उर रेहमानचा संघातील समावेश आणखीन निश्‍चित असून त्याचा संघात समावेश करून आपल्या गोलंदाजांच्या फळीला बळकट करण्याचे उद्दिष्ट पंजाबसमोर असणार आहे.

त्याचबरोबर मुंबई विरुद्धच्या सामन्यात शानदार सलामी मिळवून देणाऱ्या लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्यावर पंजाबचा संघ बऱ्याच अंशी अवलंबून असून त्यांच्या मधल्या फळीतील डेव्हिड मिलर आणि सॅम करन यांना फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश येत असल्याने त्याचा तोटा पंजाबच्या फलंदाजी विभागाला होतो आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.