#IPL2019 : कार्तिकचा रेकॉर्ड मोडून धोनी अव्वल

हैदराबाद – मुंबई आणि चेन्नई दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईचा केवळ एका धावेने पराभव करत चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्माला यष्टी मागे बाद करत धोनी आयपीएलमध्ये स्टम्प्स मागे सर्वाधीक बळी मिळवणारा यष्टीरक्षक ठरला असून त्याने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकचे रेकॉर्ड मोडले असून आता कार्तिक दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

अंतिम सामन्यापुर्वी धोनीच्या खात्यात 130 विकेट्‌स होत्या तर कार्तिकच्या नावे 131 विकेट होत्या. यावेळी सामन्यात धोनीने क्विंटन डी कॉकचा झेल पकडत कार्तिकच्या विक्रमाशी बरोबरी साधली तर यानंतर रोहित शर्माचा झेल पकडत आपला 132वा बळी मिळवत कार्तिकचे रेकॉर्ड त्याने मोडले.

Leave A Reply

Your email address will not be published.