#IPL2019 : दिल्लीसमोर आज पंजाबचे तगडे आव्हान

-विजयीलय कायम राखण्याचे पंजाबसमोर आव्हान

-गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची दिल्लीला गरज

नवी दिल्ली – आयपीएलच्या बाराव्या मोसमात आता पर्यंत प्रभावी कामगिरी करत पहिल्या तीन संघांमध्ये सातत्याने स्थान राखणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर तितक्‍याच तगड्या किंग्ज इलेव्हवन पंजाबच्या संघाचे आव्हान असून मुंबई विरुद्धच्या पराभवातून सावरत बाद फेरी गाठण्यासाठी दिल्लीच्या संघाला आज विजय आवश्‍यक असून आपली विजयीलय कायम राखण्याचे आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यंदाच्या मोसमात आपल्या नऊ सामन्यांमध्ये पाच विजय आणि चार पराभवांचा सामना करत 10 गुणांसह क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी आपल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद यांचा पराभव केला असून त्यांना किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
वेळ – रा. 8.00
स्थळ – फिरोज शहा कोटला मैदान, नवी दिल्ली

दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघानेही यंदाच्या मोसमात खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे दहा गुण झाले असून ते सध्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत.

यावेळी त्यांनी राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद या संघांचा पराभव करत आगेकूच केली असून त्यांना मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आगेकूच करत बाद फेरीच्या दिशेने कूच करण्याची संधी दोन्ही संघांना असनार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

किंग्ज इलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.