#CSKvDC : नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा निर्णय

विशाखापट्टणम – आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससमोर आज बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात विजेत्या संघाचा सामना अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स या संघाबरोबर होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यास काहीच वेळात विशाखापट्टणम येथील डॉ. वाई.एस. राजाशेखरा रेड्डी एसीए-वीडीसीए स्टेडियमवर सुरूवात होणार आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्जने जिंकला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनी याने गोलंदाजीचा निर्णय घेत दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ –

पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कॉलिन मुनरो, अक्षर पटेल, शेरफेन रूदरफोर्ड, कीमो पॉल, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा

चेन्नई सुपर किंग्ज संघ –

फाफ डू प्लेसी, शेन वॉटसन, सुरेश रैना, अंबाति रायुडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, हरभजन सिंह, इमरान ताहिर

Leave A Reply

Your email address will not be published.