आयपीएलला मिळणार बायो-बबल सुरक्षा

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर टाटा समूहाकडून प्रस्ताव

मुंबई – करोनाचा धोका कायम असतानाच अमिरातीत यंदा आयपीएल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंना तसेच पदाधिकारी व सपोर्ट स्टाफ यांना करोनाचा धोका होऊ नये या करता टाटा समूहाकडून बायो-बबल सुरक्षेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

टाटा समूहाच्या आरोग्य विभागाने हा प्रस्ताव तयार केला असून त्याचे सादरीकरणही तयार केले आहे. आता बीसीसीआयची 17 ऑगस्टला बैठक होणार असून त्यात या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे. अर्थात, टाटा समूहाने जर खेळाडूंच्या तसेच सर्व संबंधित व्यक्‍तींच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे तर त्यांच्यासह हे आव्हान पेलण्याची बीसीसीआयचीही तयारी राहील, असे संकेत बीसीसीआयच्या एका सदस्याने दिले आहेत.

तरुण प्रशिक्षकांना संधी

करोनाच्या सावटात आयपीएल सुरू होणार असली तरीही त्यानिमित्ताने बीसीसीआयनेही सुरक्षेचे व नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाशी संबंधित तसेच विविध राज्य संघांसाठी प्रशिक्षक किंवा अन्य कोणत्याही भूमिकेतच कार्यरत असलेल्या 60 वर्षांवरील व्यक्‍तींना आपले पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेपासूनच विविध संघांसाठी देशातील तसेच परदेशातील युवा खेळाडूंना प्रशिक्षक बनण्याची नामी संधी मिळाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.