#IPL : नव्या मोसमासाठी श्रेयस अय्यर सज्ज

मुंबई – भारतीय संघाचा नवोदित क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याने आपण आगामी आयपीएल स्पर्धेसह नव्या मोसमात होत असलेल्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.

आयपीएल स्पर्धेपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे त्याला आयपीएलमध्येही सहभागी होता आले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले. माझा खांदा ठीक झाला आहे.

आता आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांत मला खेळता येणार आहे. ही स्पर्धा अमिरातीत होत असल्यामुळे मला आगामी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीही चांगला सराव मिळेल, असे अय्यरने सांगितले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अय्यरच्या जागी पंतने दिलली कॅपिटल्सचे नेतृत्व केले. दिल्लीने पहिल्या फेरीतील आठ पैकी सहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. त्यामुळे श्रेयसच्या समावेशाने त्यांची ताकदही वाढणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.