मुंबई – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल सामने अर्ध्यातच स्थगित करण्यात आले होते. यासंदर्भात क्रिकेट चाहत्यांमध्ये उर्वरीत सामने कथी होणार अथवा होणार की नाही होणार याविषयी उत्सुक्ता होती. याबाबत आज इंडियन प्रीमियर लीग बाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला असून आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार असल्याचे जाहिर केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
IPL has been moved to UAE for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI pic.twitter.com/wqEukw6KGP
— ANI (@ANI) May 29, 2021
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. आयपीएलचे 31 सामने बाकी आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा आयपीएलचे 2021 चे सामने भारतात खेळवण्यात आले होते.
बीसीसीआयने आज विशेष कार्यकारिणी सोबत बैठक आयोजीत केली होती. यामध्ये बैठकीत भारतातील करोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.