नवी दिल्ली – भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला एकदा मांकड रनआऊट केले होते. त्यावर पॉन्टिंग नाराज झाला होता. मात्र, क्रिकेटच्या नियमानुसारच मी त्याला बाद केले असे त्यावेळी अश्विनने सांगितले होते. आता अश्विन दिल्ली संघाकडून खेळत असून त्याला अशी कृती पुन्हा करू देणार नाही, असा खुलासा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केला आहे.
मांकड पद्धतीने फलंदाजाला बाद करणे योग्य नाही. सज्जनांचा खेळ संबोधले जात असलेल्या क्रिकेटला ही बाब शोभणारी नाही. त्यामुळे गेल्या वेळी झाले ते झाले आता ही कृती मी अश्विनला पुन्हा करू देणार नाही, असे पॉन्टिंगने म्हटले आहे.
गेल्या वर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना अश्विनने क्रीझ सोडून पुढे गेलेल्या बटलरला मांकड पद्धतीने धावबाद केले होते. यानंतर मोठा वाद झाला होता. मात्र, या कृतीचे अश्विनने आपल्या कृतीचे समर्थन केले होते. त्यावेळी अश्विन पंजाबकडून खेळत होता. यंदा तो दिल्ली संघाकडून खेळत असून या संघाचा पॉन्टिंगच प्रशिक्षक असल्याने आता अशी कृती करू देणार नाही असा पवित्रा पॉंन्टिंगने घेतला आहे.
1947 साली झालेल्या मालिकेत भारताच्या विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन या फलंदाजाला नॉन स्ट्रायकरवर असताना क्रीझ सोडून पुढे गेल्याने धावबाद केले होते. त्यानंतर या पद्धतीने बाद होण्याला मांकड धावबाद असे म्हटले जाऊ लागले. खिलाडूवृत्तीला ही कृती मारक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असले तरी अशा पद्धतीने बाद देता येते हे नियम सांगत असल्याने अनेक खेळाडू याचे समर्थनही करतात.