नवी दिल्ली : आयपीएलच्या लिलावात सर्वात जास्त वयाचा खेळाडू म्हणून ४८ वर्षीय प्रवीण तांबेची निवड कोलकाता नाईट रायडर्स संघाने केली होती. याच प्रवीण तांबेला या स्पर्धेत खेळण्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मनाई केली आहे.
कोलकाता नाईट रायर्डसने तांबेला २० लाख रूपयांना खरेदी केले होते. येत्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणा-या आयपीएलच्या १३ व्या मोसमात आता तांबे खेळू शकणार नाही.
तांबेने गेल्या वर्षी अबुधाबी आणि शारजा येथे झालेल्या टी-१० लीगमध्ये भाग घेतला होता. मंडळाच्या नियमानुसार निवृत्ती घेतल्यानंतरच भारतीय खेळाडूंना अन्य देशातील लीगमध्ये खेळता येते.