IPL auction 2025 : – गेल्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेल स्टार्कला संघात घेण्यासाठी २४.७५ कोटी रुपये खर्च केले होते. ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम होती. मात्र रविवारी होणाऱ्या लिलावामध्ये हा विक्रम ऋषभ पंत मोडू शकतो. त्याला किमान २५ कोटींपेक्षा अधिक रकमेला खरेदी केले जाऊ शकते, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केला आहे.
जियो स्टारवरील एका कार्यक्रमात बोलताना सुरेश रैना म्हणाला, फलंदाजी आणि यष्टिरक्षणाव्यतिरिक्त ऋषभ पंत हा संघात एक्स फॅक्टर आणतो. यांच्याकडे कोणताच संघमालक किंवा प्रशिक्षक दुर्लक्ष करू शकत नाही. दिल्ली, पंजाब, कोलकाता आणि आरसीबी संघाकडे चांगली शिल्लक आहे. त्यामुळे हे संघ त्याला २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
ऋषभ पंत मैदानावर असताना नेहमीच उत्साही असतो. तो सातत्याने इतर खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित करत असतो. या संदर्भात बोलताना रैना म्हणाला, ऋषभ सातत्याने मैदानावरील खेळाडूंशी संवाद साधतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंशी त्याचे चांगले संबंध आहेत. प्रत्येक खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उत्सुक असल्यानेच तो, इतर खेळाडूंपेक्षा खास बनतो.
रविवारी होणारा लिलाव हा तीन वर्षांचा आहे. चेन्नई संघाकडे खेळाडू खरेदीसाठी तेवढी शिल्लक उपलब्ध नाही. त्यामुळे त्याला आरसीबी किंवा कोलकाता खरेदी करू शकतात. तो कोलकाता संघात दाखल झाल्यास अनेक चाहते संघात सामील होतील, असे बोलताना रैना म्हणाला.