IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव सुरु झाला आहे. मार्की खेळाडूंच्या पहिल्या सेटची सुरुवात अर्शदीप सिंगने केली. सर्व संघांनी या खेळाडूवर 2 कोटी रुपयांची बेस प्राईस असलेल्या या खेळाडूवर जोरदार बोली लावली. अखेर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून पंजाब किंग्जने त्याला सनरायझर्स हैदराबादकडून 18 कोटी रुपयांना खरेदी केले. SRH ने त्याच्यासाठी 16.75 कोटी रुपयांची बोली लावली होती.
पंजाबने केला RTM चा वापर…
अर्शदीपवरची बोली चेन्नई सुपर किंग्जने सुरू केली होती आणि त्याला मिळवण्यासाठी CSK आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काही काळ संघर्ष झाला. नंतर राजस्थान आणि गुजरातनेही बोलीत उडी घेतली, पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने 15.75 कोटींची बोली लावली. हैदराबादची बोली लागताच पंजाबला अर्शदीपसाठी आरटीएम वापरण्याबाबत विचारण्यात आले. पंजाबने अर्शदीपमध्ये रस दाखवला. यानंतर हैदराबादने 18 कोटी रुपयांची ऑफर दिली ज्यासाठी पंजाबने होकार दिला.
𝗙𝗶𝗿𝘀𝘁 𝗯𝗶𝗱 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 #TATAIPLAuction ✅
Right To Match straight into play! ✅
Arshdeep Singh 🤝 Punjab Kings
He fetches a whopping 𝗜𝗡𝗥 𝟭𝟴 𝗖𝗿𝗼𝗿𝗲 👌 👌#TATAIPL | @arshdeepsinghh | @PunjabKingsIPL pic.twitter.com/v1FQbrWPyE
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
‘राईट टू मॅच’ नियम काय आहे?
या नियमानुसार, लिलावापूर्वी एखादा संघ आपल्या कोणत्याही खेळाडूला कायम ठेवू शकला नाही, तर लिलावाच्या वेळी त्याला पुन्हा आपल्या संघात घेण्याची संधी मिळते, परंतु त्यासाठी त्या काळात इतर काही फ्रँचायझीने त्या खेळाडूसाठी जेवढे पैसे दिले आहेत ते त्याने बोली लावलेल्या रकमेत समाविष्ट करू शकतात. ही किंमत त्या खेळाडूच्या मागील किमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
मोठ्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स इशान किशनला कायम ठेवू शकले नाहीत आणि लिलावाच्या वेळी पंजाब किंग्ज संघाने त्याला खरेदी केले, तर अशा परिस्थितीत मुंबईला इशानला मिळवण्यासाठी आरटीएम कार्ड वापरण्याची संधी मिळेल आणि त्याला पुन्हा आपल्या संघाचा भाग बनवता येईल. मात्र, या काळात पंजाब किंग्जने इशानसाठी जी बोली लावली आहे, तेवढीच रक्कम मुंबईला स्वतःच्या पर्समधून खर्च करावी लागेल.
अर्शदीपची T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द….
या डावखुऱ्या गोलंदाजाने 2022 मध्ये भारताकडून पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 95 बळी घेतले आहेत. भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो युझवेंद्र चहलपासून फक्त एक पाऊल दूर आहे.
अर्शदीप विश्वचषक विजेत्या संघाचा होता भाग…
मेगा लिलावापूर्वी पंजाबने त्याला कायम ठेवले नाही. अर्शदीप 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता आणि तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली होती. अर्शदीप सिंगच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 65 सामन्यांमध्ये 76 विकेट घेतल्या आहेत.