IPL 2025 Mega Auction : – इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामापूर्वी, सर्व संघमालकांनी संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. उर्वरित खेळाडू हे लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. आगामी आयपीएलसाठी 24 व 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव रियाधमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
लिलावापूर्वी १० संघमालकानी तब्बल ५५८.५ कोटी रुपये खर्चून ४६ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये ३६ भारतीय तर १० विदेशी खेळाडूंचा सहभाग आहे. संघमालकानी ३६ भारतीय खेळाडूंपैकी १० अनकॅप्ड खेळाडूंना देखील संघात कायम ठेवले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्स संघाने ऋषभ पंत तर लखनौ सुपर जायंट्स संघाने लोकेश राहुल यांना लिलावासाठी उपलब्ध करून दिले आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ तीन खेळाडू संघात कायम ठेवले असून यात विराट कोहली, रजत पाटीदार व यश दयाल यांचा समावेश आहे.
पंजाब किंग्स संघाने एकाही नियमित खेळाडूंना संघात स्थान दिलेले नाही. त्यांनी केवळ शाशंक सिंग व प्रभसिमरन सिंग या दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यामुळे यावेळी पंजाब संघाकडे ११०.५ कोटी रुपयांची शिल्लक या लिलावासाठी असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीला संघात कायम ठेवले आहे.
कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा.
कोलकाता नाइट रायडर्स : रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग.
मुंबई इंडियन्स : जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी.
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल.
गुजरात टायटन्स : राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान.
लखनौ सुपर जायंट्स : निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी.
सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.
पंजाब किंग्स : शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग.