IPL 2025 Mega Auction : – सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मेगा लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सचा या यादीमध्ये समावेश नाही. नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये स्टोक्सचा माजी सहकारी जेम्स अँडरसन, इटालियन वेगवान गोलंदाज थॉमस ड्रॅक्युला आणि भारतात जन्मलेला अमेरिकन मध्यमगती गोलंदाज सौरभ नेत्रावलकर यांचा देखील समावेश आहे.
यापूर्वी बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स व रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र या लिलावासाठी त्याने नोंदणी न केल्याने बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला २०२७ पर्यंत आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. तब्बल १० वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने देखील आयपीएलसाठी नोंदणी केली आहे. जेम्स अँडरसनने २०१४ मध्ये शेवटचा टी-२० सामना खेळाला होता. यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा सौरभ नेत्रावलकर याने देखील या हंगामासाठी नोंदणी केली आहे.
मागील लिलावात विकला न गेलेला ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकीपटू नॅथन लॉयनने देखील यावर्षी पुन्हा नोंदणी केली आहे. त्याबरोबरीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर हे देखील लिलावात असणार आहेत. मिचेल स्टार्क हा गेल्या हंगामात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला २४.५ कोटी रुपये मिळाले होते.
इटलीचा थॉमस ड्रेका
इटालीसाठी केवळ चार टी-२० लढती खेळणाऱ्या थॉमस ड्रेकाने देखील आगामी आयपीएलच्या हंगामासाठी नोंदणी केली आहे. या चार सामन्यामध्ये थॉमसने ८ बळी टिपले आहेत. त्याने ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमध्ये देखील आपला सहभाग नोंदविला होता. थॉमसने या स्पर्धेत ब्रॅम्प्टन वुल्व्ह्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे नवख्या थॉमस ड्रेकाला कोणाता संघ खरेदी करतो, हे पाहणे उत्सुकतापूर्ण ठरणारे आहे.
Border–Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडिया जोरदार पुनरागमन करू शकते – जोश हेझलवूड
कोणत्या संघाकडे किती रुपये (कोटींमध्ये)
पंजाब किंग्स : ११०.५ ,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : ८३,
दिल्ली कॅपिटल्स ७३,
गुजरात टायटन्स ६९
लखनौ सुपर जायंट्स : ६९
चेन्नई सुपर किंग्स : ५५,
कोलकाता नाईट रायडर्स : ५१
मुंबई इंडियन्स : ४५
सनरायझर्स हैदराबाद : ४५
राजस्थान रॉयल्स : ४१