IPL 2025 Mega Auction : गेल्या तीन वर्षांपासून लखनऊ सुपर जायंट्सचा(LSG) कर्णधार असलेल्या केएल राहुलला यावेळी LSG ने सोडले (रिलीज) आहे. आयपीएल 2024 नंतर राहुल हा एलएसजीपासून वेगळा झाल्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यानंतर आता केएल राहुल आयपीएल 2025 मेगा लिलावाचा भाग असेल. त्याच वेळी,राहुलच्या जागी लखनौ सुपर जायंट्सची नजर आता एका धडाकेबाज अशा स्टार खेळाडूवर आहे जो विकेटकीपिंगसह स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला यावेळी मुंबई इंडियन्सने सोडले आहे. इशान किशन गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. मात्र, शेवटचा सीझन किशनसाठी काही खास नव्हता. त्यामुळे मुबंईनं त्याला कायम ठेवले नाही. त्यानंतर आता ईशान किशन मेगा लिलावाचा भाग असणार आहे. अशा स्थितीत लखनौ सुपर जायंट्सची नजर या यष्टीरक्षक फलंदाजावर असेल.
यावेळी लखनौने निकोलस पुरन याला 21 कोटी, रवी बिश्नोई आणि मयंक यादव यांना 11 कोटी आणि आयुष बडोनी-मोहसीन खान यांना प्रत्येकी 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे तर राहुलला रिलीज केलं आहे. त्यामुळे आता संघाला यष्टिरक्षक फलंदाजाचीही गरज आहे. अशा परिस्थितीत इशान किशन एलएसजीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
तसं पाहता एलएसजीकडे निकोलस पूरन हा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून उपलब्ध आहे, परंतु अहवालानुसार, फ्रँचायझी पूरनला आयपीएल 2025 मध्ये एलएसजीचा कर्णधार बनवू शकते. अशा स्थितीत संघाला पुरनवर जास्त भार टाकायचा नाही.
इशान किशनची आयपीएल कारकीर्द…
आतापर्यंत इशान किशनने आयपीएलमध्ये 105 सामने खेळले आहेत. ज्याच्या 99 डावांमध्ये या खेळाडूने 2644 धावा केल्या आहेत. या काळात किशनचा स्ट्राइक रेट 135.87 होता. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय ईशानच्या बॅटमधून 255 चौकार आणि 119 षटकार आले आहेत.