IPL 2024 | IPL Player : आयपीएल 2024 च्या मोसमात फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली असून त्यामुळे अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत. याशिवाय चालू हंगामातील प्रत्येकी एका सामन्यासाठी अनेक मोठे स्टार्स आसुसलेले आहेत.
आम्ही तुम्हाला अशा पाच आयपीएल स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना आतापर्यंत संधी मिळाली नाही. मात्र, मागील मोसमात यातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली होती.
काइल मेयर्स : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज काइल मेयर्स हा आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहे. या मोसमात मेयर्सला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी, मेयर्सने लखनौसाठी सलामी दिली आणि 13 सामन्यांत 379 धावा केल्या.
ग्लेन फिलिप्स : न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. मात्र, हैदराबादने फिलिप्सला एकही संधी दिलेली नाही. गेल्या मोसमात त्याने हैदराबादकडून पाच सामने खेळले.
मिचेल सँटनर : न्यूझीलंडसाठी मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून खेळणारा मिचेल सँटनर आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे. सँटनरने मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये चेन्नईसाठी 3 सामने खेळले होते, परंतु या हंगामात त्याला एकही संधी देण्यात आलेली नाही.
नवदीप सैनी : भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीही या मोसमात आतापर्यंत बेंचवर बसलेला दिसला आहे. राजस्थान रॉयल्सने चालू हंगामात सैनीला एकही संधी दिलेली नाही. 2023 आणि 2022 IPL मध्ये तो फक्त 2-2 सामने खेळला होता.
रहमानुल्ला गुरबाज : कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा अफगाणचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये सलामीला फलंदाजी करताना दिसला. पण, KKR ने त्याला IPL 2024 मध्ये एकही संधी दिलेली नाही.