अहमदाबाद- आयपीएल 2023 चा 62 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सुरु आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा असणार आहे.
गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत हैदराबादला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले आहे. गुजरातने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 188 धावा केल्या. तर शुभमन गिलने 101धाव करत दमदार शतक ठोकले आहे. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक पाच बळी घेतले आहे.