नवी दिल्ली – दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या संदर्भातील एक ट्विट देखील संघाने आपल्या अधिकृत ट्विट आकाउंटवर शेअर केलं आहे. दुखापतीमुळे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. हा दिल्लीसाठी मोठा धक्का मानला जातोय.
आणि त्यामुळेच आता ऋषभ पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरकडे संघाची धुरा सोपवली आहे. 2022 वर्षाच्या अखेरीस एका कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता, यातून तो अद्याप सावरलेला नाही. तसेच, डॉक्टरांनी देखील ऋषभ पंत आराम करण्याचा सल्ला दिली आहे.
POV: Imagining Captain Davey arriving at #QilaKotla via the nearest #DelhiMetro 🐯🚇
Dilli, it’s time to roar together this #IPL2023 with David Warner (𝗖) ❤💙#YehHaiNayiDilli | @davidwarner31 pic.twitter.com/xzEoWhKyyR
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 16, 2023
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरकडे संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवल्यानंतर ‘अक्षर पटेल’कडे देखील उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. वॉर्नरने यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याने 2016 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. 2022 मध्ये तो दिल्ली संघात सामील झाला. त्याला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्या सिजनमध्ये वॉर्नरने चांगली कामगिरी केली होती.