नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार अष्टपैलू मिचेल मार्शच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट मिळाले आहे. मिचेल मार्शची दुखापत अद्याप बरी न झाल्याने तो आगामी 3 ते 4 आयपीएल सामने खेळू शकणार नाही. पाक दौऱ्यावर असताना त्याला दुखापत झाली होती. दिल्ली कॅपिटल्सने यावेळी मिचेल मार्शला 6.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
मिचेल मार्श दिल्ली कॅपिटल्ससाठी अद्याप तरी फायदेशीर ठरलेला नाही. गेल्या महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्याला दुखापत झाली होती. दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग म्हणाला होता की स्टार अष्टपैलू मिचेल मार्श 10 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करेल, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मिचेलला येत्या 3 ते 4 सामान्यांसाठी मुकावे लागणार आहे. हे संघासाठी व त्याच्यासाठी ही नुकसानकारक असल्याचे बोलले जात आहे.